Wednesday, March 31, 2010

पुढील महत्वाची गोष्ट Gangal1 मधुन टाईपिंग करताना लक्षात ठेवा.

व्यंजनाचा उच्चार स्वराशिवाय साध्य होत नाही.
मराठीत व्यंजने कोणती? याचे उत्तर प्रत्येक व्यंजनात 'अ' स्वर मिसळून आपण 'क, ख, ग, . . 'असे देतो. 'का, खा, गा, . . . ', 'के, खे, गे, . . .', 'को, खो, गो, . . .' वगैरे देत नाही.  मराठी बाराखडीतल्या प्रत्येक अक्षरात 'व्यंजन + 'अ' स्वर मिसळलेले रूप' असते. 'क, का, कि, की, कु, कू, के, कै, को, कौ' या प्रत्येकात 'क-व्यंजन + अ-स्वर' हे रूप असतेच. 'प, पा, पि, पी, पु, पू, पे, पै, पो, पौ' या प्रत्येकात 'प-व्यंजन + अ-स्वर' हे रूप असतेच. 'द, दा, दि, दी, दु, दू, दे,  दै' या प्रत्येकात 'द-व्यंजन + अ-स्वर' हे रूप असतेच.
'हवेवर ओठांनी लीहावे, तसे कागदावरच्या शाईला बोलता यावे', यासाठी पुढील महत्वाची गोष्ट टाईपिंग करताना लक्षात ठेवा.
१) जेव्हा जोडाक्षर लिहायचे नसेल तेव्हा व्यंजनात 'अ' स्वर मिसळा.
२) ख, ग, घ, . . .  वगैरे ज्या अक्षरांना पुर्ण स्वर दंड (उभी रेष) असतो तो पुरा करायला ' a ' ही चावी वापरा.
३) द, र, ड, . . . . वगैरे ज्या अक्षरांना थोडी शिरोरेष द्यावी लागते ती पुर्ण करायला ' / ' ही चावी वापरा.
अधीक माहितीसाठी साईटवर दीलेल्या फाईल्स पहा वा संपर्क साधा.
आपला, शुभानन गांगल

No comments:

Post a Comment