Wednesday, April 28, 2010

'शोध मराठीचा' संशोधना तर्फे 'सोप्पी मराठी' च्या सीडी चे उदघाटन

'शोध मराठीचा' संशोधना तर्फे 'सोप्पी मराठी' च्या सीडी चे उदघाटन १ मे रोजी 'मुंबई मराठी पत्रकार संघ' येथे दुपारी ३:३० ला होणार आहे. 'सोप्पी मराठी' बाबतच्या अधिक माहितीसाठी संपर्क साधा.

Sunday, April 18, 2010

'देवनागरी लिपी मध्ये मराठीसाठी बदल करण्याची गरज'

'देवनागरी लिपी मध्ये मराठीसाठी बदल करण्याची गरज'
या विषयावर 'शोध मराठी'चा तर्फे झालेल्या 'PowerPoint' प्रेझेन्टेशनची फाईल आम्ही मोफत उपलब्ध करत आहोत. त्यासाठी या ईमेल वर वीचारणा करा.

Saturday, April 3, 2010

www.shodhmarathicha.com ला भेट द्या.

स्वतंत्र सोपी सहज मराठी,      स्वर व्यंजने आणी अक्षरे,     संगणकातुन सर्वांसाठी
नीव्वळ केवळ फक्त मराठी,     सोळा आणे, शंभर टक्के,      मराठमोळी माय मराठी
लिहा मोफत नीखळ मराठी,     नव्या युगाच्या संवादार्थ,      'गांगल१' तुमच्याच साठी
विकास होवो कसा कितीही,     संगणकामधला 'गांगल१',      कालबाह्य ना ठरे कधीही
उगा कशाला पैसे खर्चा,        सर्वांसाठी मोफत असता,      'गांगल१' अपुल्याच घरचा
वर्ड, एक्सेल सगळ्यासाठी,      ईमेलच्या पानांमधुनी,        'गांगल१' चे माय मराठी
www.shodhmarathicha.com ला भेट द्या.

Wednesday, March 31, 2010

पुढील महत्वाची गोष्ट Gangal1 मधुन टाईपिंग करताना लक्षात ठेवा.

व्यंजनाचा उच्चार स्वराशिवाय साध्य होत नाही.
मराठीत व्यंजने कोणती? याचे उत्तर प्रत्येक व्यंजनात 'अ' स्वर मिसळून आपण 'क, ख, ग, . . 'असे देतो. 'का, खा, गा, . . . ', 'के, खे, गे, . . .', 'को, खो, गो, . . .' वगैरे देत नाही.  मराठी बाराखडीतल्या प्रत्येक अक्षरात 'व्यंजन + 'अ' स्वर मिसळलेले रूप' असते. 'क, का, कि, की, कु, कू, के, कै, को, कौ' या प्रत्येकात 'क-व्यंजन + अ-स्वर' हे रूप असतेच. 'प, पा, पि, पी, पु, पू, पे, पै, पो, पौ' या प्रत्येकात 'प-व्यंजन + अ-स्वर' हे रूप असतेच. 'द, दा, दि, दी, दु, दू, दे,  दै' या प्रत्येकात 'द-व्यंजन + अ-स्वर' हे रूप असतेच.
'हवेवर ओठांनी लीहावे, तसे कागदावरच्या शाईला बोलता यावे', यासाठी पुढील महत्वाची गोष्ट टाईपिंग करताना लक्षात ठेवा.
१) जेव्हा जोडाक्षर लिहायचे नसेल तेव्हा व्यंजनात 'अ' स्वर मिसळा.
२) ख, ग, घ, . . .  वगैरे ज्या अक्षरांना पुर्ण स्वर दंड (उभी रेष) असतो तो पुरा करायला ' a ' ही चावी वापरा.
३) द, र, ड, . . . . वगैरे ज्या अक्षरांना थोडी शिरोरेष द्यावी लागते ती पुर्ण करायला ' / ' ही चावी वापरा.
अधीक माहितीसाठी साईटवर दीलेल्या फाईल्स पहा वा संपर्क साधा.
आपला, शुभानन गांगल

'शोध मराठीचा' संशोधन

'शोध मराठीचा' संशोधनाच्या

या साईट मुळे पुढील गोष्टी साध्य होतात.
१) Gangal1 Font डाऊनलोड करून तुमचा संगणक मराठीतुन सुरु होतो.
२) मित्राला मराठीतून ईमेल पाठवता येते व त्याला Gangal1 Font डाऊनलोड करण्याची सोय आपोआप जाते.
३) मित्राला त्याच्या संगणकाचा वापर मराठीतून करता येतो.
३) मित्राला मराठीतून पाठवलेली ईमेल, त्याला त्याच्या संगणकात मराठीत वाचता येणे १०० टक्के शक्य होते.
४) ज्यांच्याकडे इंटरनेट नाही त्यांना पेन ड्राईव्ह मधुन तुम्ही Gangal1 Font देऊ शकता.